Wednesday 23 July 2014

पावसाचे आगमन झाले आणि मनात काही शब्द आले !!




पावसाचा शिडकावा झाला मन प्रसन्न झाले,
चिंतीत शेतकरीचे काळीज भरून आले,
पाड पांडुरंगा पाऊस धो-धो तोही गारवा देणारा,
आम्हा धनधान्य आणि देशास समृद्धीकडे नेणारा,

हरी म्हना करी पावसाले सुरवात,
देई मनशांती अन बळीराजाले साथ,
पाणीसाठी वण-वण कश्यासाठीरे तू करी,
पावसानं पाणी ले तू घागर मा भरी,

हाउ संदेश ध्यानमा ठेवजो रे भाऊ,
मी-बी करसु तू-बी कर पाण्यानी बचत,
यान्हावरच राहीन उभी उदयानी इमारत….
पुन्हा भेटसुत.
-
गोपाल अनिलकुमार पालीवाल

“बाय-पास” बालपण


दुपारी जेवायला गेलो मेसवर तेथे एक साधारणतः १० वर्षांचं पोरगं १० रुपयाची नोट घेऊन आलं. काका, मला ईडली द्या एक प्लेट असे बोलला. मेसवाले काका म्हणाले, १० रुपयात काही ईडली येते का? जा घरी.....

अगोदर विनोद केला पण त्यांनी नंतर त्या मुलाला ईडली प्लेट खायला दिली. (जी १५ ते २० रुपयाला मिळते.) असो, यापुढचा त्या दोघांचा संवाद मला एक नवीन शिकवण देऊन गेला. 

काय रे....काय नाव तुझे ? कुठे राहतोस ? या प्रश्नाचा मारा होऊनही पोरगं आपले ते खाण्यातच मग्न होते. ५ मिनटात एक शब्द बोलले.... पर्वती ला राहतो. पुन्हा तोच प्रश्न नाव काय ? वडील कुठेय? पोरगं मग थोडे खाल्ल्यानंतर बोलले मी आकाश आणि माझे वडील घरी असतात. आणि आई कुठे माहित नाही...... :( 

मला हे सर्व संभाषण ऐकून खूप वाईट वाटले. त्यात आणखी तो मुलगा गेल्या दोन वर्षांपासून शाळेत नापास होत आहे हे सुद्धा त्याने काकांनी विचारल्यावर सांगितले. त्याला आम्ही बोललो कि बाळ थोडा अभ्यासाकडे लक्ष डे, आणि बाबांना सांग काम करायला. ज्याने तुझे कूच शिकणे को मिलेगा. असाच थेट मी त्याला बोललो.
तो हसला.....थोडा थांबला आणि म्हणाला, भैया..... क्या बात बताई पण मला नाही शिकायचे..... :(  शाळा नाही आवडत आपल्याला.

हे त्याचे बोलणे कानावर पडले आणि मी आणि मेसवाले काका एकमेकांशी बोलू लागलो. काय संस्कार होताहेत आजच्या मुलांवर, त्यांचे भविष्य काय ? त्यांना काय करावे चांगले हे सांगायला कोणी नाही असेच वाटते. आणि मग काय शेवटी हीच मुले पुढे काही वाईट कामे करू लागतात. एवढे बोललो आणि मीही माझ्या ऑफिसला निघालो. 

पण येतांना सारखे ते शब्द आणि डोळ्यात ती परिस्थिती होती. यावरून एवढेच लक्षात येते. आज लहान मुलांना चांगले शिकविणे किती अवघड आहे, कारण ते एकतर त्यात (संस्काराच्या परीक्षेत आणि शाळेत) पास होतात किंवा त्यापासून केवळ बाय-पास.

बस एवढेच पुन्हा भेटूया.


-                                                                                                                                                                                                     - गोपाल अनिलकुमार पालीवाल