पुन्हा काही वेळ काढून लिहित आहे, त्या मित्रांसाठी ज्यांनी माझ्यासोबत राहून
मला बरेच काही शिकविले. थेट बालवाडीपासून तर मास्टर्सपर्यंतचे, नोकरीच्या निमित्ताने मार्गदर्शक आणि माझे कुटुंबीय अशा सर्व मित्रांनो
तुम्हा सर्वांना या मैत्रीदिनी शुभेच्छा !!
तसे दिवसाची वाट मी पाहत नसतो. पण या सोशल मीडियाच्या जगात आता हे सर
चालायचेच.
मित्र हा तसा आपल्यासोबत एक भावाप्रमाणे असतो. त्याची प्रत्येक गोष्ट ही कशी
मनाला कळते. ती तितक्याच हक्काने मनाला भिडतेही. अश्याच मनाला थेट भिडणाऱ्या आणि
प्रसंगी माझ्यासाठी समोरच्याशी भिडणाऱ्या मित्रांचा सहवास मला लाभला. त्यामुळे मी
स्वतःला खऱ्या अर्थाने “मैत्रीपूर्ण” आणि "मित्रसंपन्न" समजतो.
त्यांच्यासोबत खाल्लेला शाळा सुटल्यानंतरचा ‘पोंगा-पंडित’,
सोबत खेळलेला फुटबॉल, क्रिकेट चा खेळ (अल्युमिनियमच्या पेटीचा स्टंपवाले क्रिकेट),
केलेली धूम, मस्ती आणि उडविलेली टिंगल. कॉलेजमध्ये याच मित्रांसोबत केलेले पराक्रम,
कार्यक्रम आणि कट्ट्यावरील मस्ती.
यानंतर थोडे विभागलो आम्ही सर्व मित्र. पण, पुन्हा जेव्हा
मास्टर्स करायला गेलो तेव्हा पुन्हा नवीन मित्र-मैत्रीणींशी गट्टी जमली.
त्यांच्यासोबतचा कट्ट्यावरील अभ्यास, लॉजिकल शब्दांचे केलेलं शब्द-हरण, त्यापासून तयार केलेले नवीनशब्द (कळ्या,
अभ्युप्गम, गृहीतके आणि अनेक आहेत). पण, गेलेले दिवस त्या आठवणी, नोंदवही काही
अभ्यासाच्या निमित्ताने उघडल्यावर समोर उभे राहतात. मन थेट त्या ठिकाणी पोहचते आणि
म्हणते.... काय किती असाईनमेंट झाल्या?” आणि “काय लेक्चर पुन्हा बुडाले....सर ओरडतील आता....”
असो...मनात त्या आठवणी होत्या त्या माझ्या या ब्लॉगद्वारे शेअर केल्यात. आपणदेखील मन मोकळे करू शकतात. त्यासाठी कोणतेही आमंत्रण
नाही कृपया आपणही आपल्या मैत्रीच्या आठवणी सांगाव्यात. किंवा याठिकाणी येऊन केवळ
लाईक न करता आपली कमेंट नक्की टाका आवडेल मला..... त्यामुळे मला आणखीन लिहण्यास
हुरूप मिळेल.....!!
धन्यवाद माझ्या सर्व मित्रांनो !!@@!!
तुमचा मित्र – गोपाल अनिलकुमार पालीवाल
खूप छान !! मैत्री दिनाच्या खूप शुभेच्छा
ReplyDelete- अमोल शिंदे , चोपडा
मोजक्या शब्दात पण खूप छान लिहिले मित्रा...खरोखर आपल्या शालेय जीवनाच्या आठवणी ताज्या झाल्या..मैत्री दिनाच्या खूप शुभेच्छा!!!
ReplyDeleteदिपेश लाड.. चोपडा